संपात चोपडा तालुक्यातील सर्व संघटना सहभागी… एकच मिशन – जूनी पेन्शन चा नारा देत सरकारचा निषेध…..

संपात चोपडा तालुक्यातील सर्व संघटना सहभागी… एकच मिशन – जूनी पेन्शन चा नारा देत सरकारचा निषेध…..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी



१४ मार्च २०२३ चा बेमुदत संप”” यशस्वी करण्यासाठी चोपडा तालुक्यातील सर्व माध्यमिक,उच्च माध्यमिक व खाजगी प्राथमिक संघटना, महसूल, आरोग्य, नगर पालिका यांसह सर्वच विभागातील कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
त्यात चोपडा तालुका मुख्याध्यापक संघ , चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघ ,चोपडा तालुका शिक्षक लोकशाही ,चोपडा तालुका शिक्षकेतर संघ ,चोपडा तालुका उच्च माध्यमिक शिक्षक संघ ,चोपडा तालुका शिक्षक भारती संघटना ,चोपडा खाजगी तालुका प्राथमिक शिक्षक महासंघ , चोपडा तालुका जुनी पेंन्शन हक्क संघटना, चोपडा तालुका कलाध्यापक संघ , चोपडा तालुका क्रीडा शिक्षक संघ , चोपडा तालुका काँग्रेस शिक्षक सेल ,चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक सेना ,चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल ,चोपडा तालुका समता शिक्षक परिषद आदी संघटना सहभागी झाल्या आहेत.


संपात विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात नवीन पेन्शन योजना रद्द करणे, प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन, सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा, सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करा, निवृत्तीचे वय ६० करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे.
सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी लढा उभारला आहे. या साठी सरकार सोबत चर्चा करण्यात आली होती. विधानभवनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन संघटना, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संपाचा सामान्यांवर परिणाम

या संपामुळे सामान्य नागरिकांची कोंडी होणार आहे. कर्मचारी आंदोलनात असल्याने अनेक शासकीय कामे खोळंबणार आहेत. राज्यातील शिक्षकांनीही संपाला पाठिंबा दिल्यामुळे दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे, अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या प्रक्रियेतही अडथळे येण्याची शक्यता आहे. हा संप बेकायदेशीर असल्याचे म्हणत शासनाने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More