चोपड़ा शहरातील मुस्लीम भागात रमजान न निमित्त औषधी फवारणी तसेच बंद पथदिवे सुरु करण्यात यावे राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष ,नईमोद्दिन एनोद्दीन शेख…

चोपड़ा शहरातील मुस्लीम भागात रमजान न निमित्त औषधी फवारणी तसेच बंद पथदिवे सुरु करण्यात यावे राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष ,नईमोद्दिन एनोद्दीन शेख…

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी..




चोपड़ा शहरातील मुस्लीम भागात रमजान निमित्त औषधी फवारणी तसेच बंद पथदिवे सुरु करण्यात यावी.मुस्लीम समाजाचा पवित्र महिना २३ मार्च पासून सुरु होत आहे. मात्र शहरातील अनेक मुस्लीम भागातील पथदिवे बंद तर रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य आहे.

यामुळे उपवास ठेवणाऱ्याना त्रास सहन करावा लागतो. यामुळे मुस्लीम भागातील सर्व पथदिवे सुरु करावे तसेच महाराष्ट्र मध्ये H3 N2 विषाणू चा प्रादुर्भाव पसरलेला आहे. आणि रमजान महिन्यात दररोज साफ सफाई करून फवारणी करावी. तसेच आझाद चौक, कुर्शीद अली दर्गा अली, चुनार अली, मोमीन अली बैठक वाडा, कुरेशी वाडा, साने गुरुजी वसाहत, अपार्टमेंट, शेखपुरा, के.जि. एन कॉलनी, मुस्तुफा कॉलनी, सुशीलाबेन शाह नगर आशियाना कॉलनी, मणियार अली, हमीद नगर फकीर वाडा, बार्गन अली, समता नगर, लहान दर्गा अली, भोकर वाडा, पटवे अली, असे चोपडा शहरातील मुस्लीम बहुल परिसर आहेत. या सर्व ठिकाणी साफ सफाई . करण्यात यावी असे निवेदन चोपडा नगर पालिकेला देण्यात आले.यावेळी नईमोद्दिन एनोद्दीन शेख राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष ,कासम युसुफ मोमीन, हुस्नुद्दीन चिरागो दिन जागीदार, फिरोज गायास खान,यांचा सह कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More