हभप पंकज पाल यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम

हभप पंकज पाल यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


शिक्षणमहर्षी तथा शेतकऱ्यांचे खरे कैवारी असलेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने ” क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक उत्सव समिती चोपडा” यांच्या विद्यमानाने महाराष्ट्रातील नावाजलेले तथा राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प सत्यपाल महाराज यांचे शिष्य ह भ प पंकज पाल महाराज सामाजिक प्रबोधन तसेच हास्य विनोदी कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


तरी आपण सर्व पंचक्रोशीतील बांधवांनी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या प्राणांगणात दिनांक १० एप्रिल सोमवार रोजी संध्याकाळी ७:०० वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे पंचक्रोशीतून तसेच चोपडा शहरातून सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सार्वजनिक उत्सव समिती यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More