बाळकृष्ण सोनवणेच्या काव्यसंग्रहास कवी यशवंत स्मृती पुरस्कार

बाळकृष्ण सोनवणेच्या काव्यसंग्रहास कवी यशवंत स्मृती पुरस्कार

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा – येथील जेष्ठ कविवर्य बाळकृष्ण सोनवणे यांच्या ‘समजूतदार जाणिवांचे कवडसे’ या काव्यसंग्रहाची महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा उत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून निवड करण्यात आली असून कवि यशवंत स्मृती पुरस्कार २०२१ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.रोख रकम आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

दि.२४ एप्रिल ला जेष्ठ साहित्यिक डॅा.शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते व मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांचे अध्यक्षतेखालील कार्यक्रमात पुण्याच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणा-या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.या पुरस्कारा बाबत मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी,प्रभारी प्रमुख कार्यवाह सुमित्राराजे पवार,कार्यवाह उध्दव कानडे यांनी कळविले आहे.कवी बाळकृष्ण सोनवणे यांच्या काव्यसंग्रहांना यापुर्वी देखील देशातील मानाचे समजले जाणारे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांचे या पुरस्कारानिमित्ताने म.सा.प.च्या चोपडा शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे,कार्याध्यक्ष विलास पाटील,उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन,कार्यवाह संजय बारी व पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More