ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

*ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*.

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी



चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते करण्यात आले. या युगपुरुषाच्या जयंतीनिमित्त शाळेतील शिक्षक अमन पटेल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. भारतरत्न, बोधिसत्व, महान अर्थशास्त्रज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

समाजसुधारक, क्रांतिकारक, लेखक…. यांसारख्या विविध भूमिकांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनजागृती केली. त्यांच्या बालपणापासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या विविध प्रसंगांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी उत्कृष्ट फलक रेखाटन केले. कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More