अडावद श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास प्रारंभ…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
अडावद ता.चोपडा : येथे प्रतिवर्षानुसार श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व आदेशानुसार अखंड नाम जप ,यज्ञ सप्ताहाचे आयोजन अडावद येथील कृष्णाजी नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे दि.११ एप्रिल ते १८ एप्रिल, दरम्यान आयोजित करण्यात आले असून या सप्ताह कालावधीत पाचवा वेद म्हणून ओळखल्या जाणार्या श्री गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथाचे पारायण, नवनाथ भक्तिसार, हवनयुक्त गुरुचरित्र, अखंड प्रहरे यामध्ये स. ८ ते रात्री ८ यावेळेत महिला व रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुरुष प्रहरे राहतील. तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या नियोजनानुसार श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री स्वामी याग, श्री चंडी याग, गीताई याग, रुद्र मल्हारी याग, बली पूर्णाहुती, सत्यदत्त पूजन, दररोज नित्य स्वाहाकार, अब्जचंडी अंतर्गत श्री स्वामीचरित्र सारामृत, असे सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामाभियान प्रशिक्षण असे भरगच्च कार्यक्रम या सप्ताह कालावधीत संपन्न होत आहेत. दि.१८ एप्रिल, रोजी श्री सत्यदत्त पूजन होऊन सकाळी १० वाजता सप्ताह सांगता महाआरती होईल नंतर मांदियाळी स्वरुपात महाप्रसाद वाटप होणार सायंकाळी गावातून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असून या सर्व सेवेत अडावद पंचक्रोशितील सर्व भाविक भक्त, सेवेकर्यांनी, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, अडावद सेवाकेंद्रातील सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.















