नोबेल विज्ञान प्रेरणा पुरस्काराने प्रताप विद्या मंदिर सन्मानित…

नोबेल विज्ञान प्रेरणा पुरस्काराने प्रताप विद्या मंदिर सन्मानित


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी

नोबेल फाउंडेशन जळगाव तर्फे दिला जाणारा सन 2023 चा राज्यस्तरीय नोबेल विज्ञान प्रेरणा पुरस्कार विज्ञान क्षेत्रातील भरीव कामगिरी केल्याबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिरास दिनांक 30 एप्रिल 2013 जळगाव या ठिकाणी दिमागदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

शाळेमार्फत तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षणात आवश्यक फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथेमॅटिक्स भूगोल या विषयांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा असून विद्यार्थ्यांसाठी मोफत आयआयटी फाउंडेशनचे वर्ग तसेच विद्यार्थ्यांसाठी घेत असलेले विज्ञान प्रदर्शन, लहान वयातच विज्ञाननिष्ठा रूजवण्यासाठीचे शाळेमार्फत केलें जाणारे प्रयत्न व शिक्षकांसाठी असलेले स्टेम फोरम आदी विविध कार्यक्रम शाळेमार्फत चालवले जातात. या विज्ञानामुळे समाजात विवेक जिवंत राहून या विवेकामुळे मानवता समृद्ध झाली आहे व विज्ञानाच्या सेवेसाठी प्रताप विद्या मंदिराच्या माध्यमातून अनेक विज्ञान वारकरी घडवून समाजाची सेवा केली जात आहे या विविध गुणवत्ता पूर्ण कार्यामुळे शाळेची पुरस्कारासाठी विशेष निवड करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


शतकोत्तर वाटचाल करणारी प्रताप विद्या मंदिर ही शाळा चोपडा तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे महान राष्ट्रीय कार्य करीत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या प्रचार व प्रसार करण्याची मोलाची भूमिका असून समाजातील हजारो कुटुंबातील अंधश्रद्धा व ज्ञान दूर करण्याचे प्रयत्न सदैव शाळा करीत आहे


सदर पुरस्कार इस्रोचे शास्त्रज्ञ श्री सतीश सेतूमाधव यांच्या शुभहस्ते शाळेला प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्राप्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सौ शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथकाका अग्रवाल, चेअरमन श्री राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर , संचालक चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी, रमेशकाका जैन, प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील , संस्थेने समन्वयक गोविंद गुजराथी , डी टी महजन आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More