अनेर धरणाचे आवर्तन न सोडल्याने १८ मे गुरवारी गलंगी येथे रस्ता रोको करण्याबाबत…
अनेर नदी काठावरील सोळा गावांच्या पाणी योजनांसाठी व गुरेढोरे यांच्यासाठी अनेर धरणातून पाणी आवर्तन सोडणेसाठी शेतकरी कृती समितीने गेल्या २१एप्रिल २०२३रोजी निवेदन दिले होते,परंतु अद्याप ते न सोडल्याने परिस्थिती बिकट होत आहे.
शेतकरी कृती समितीने गेल्या पाच सहा वर्षांपासून दरवर्षी अनेर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडनेसाठी प्रशासकीय पातळीवर रीतसर आरक्षण करून घेतले असते,दरवर्षी साधारणपणे १५मे पर्यंत ते आवर्तन घेतले जाते. प्रत्येक वेळेस पाटबंधारे विभाग धुळे हे त्यांचे थकीत पाणी बिल ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,जिल्हापरिषद जळगाव यांनी न भरल्यामुळे पाणी सोडण्यात असमर्थता दर्शवित असतात,अर्थात दोघेही शासकीय विभाग व दुष्काळाचे पाणी देयके संबंधित विभागाने त्यांना अदा केले पाहिजेत हा त्यांचा प्रशासकीय भाग आहे.

या वर्षीचा उन्हाळा प्रचंड त्रासदायक झाला असून फक्त एका आठवड्यात माणसे गुरे ढोरे यांचे पिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.त्यांना मदत करणे सोडून त्यांना वेठीस धरणे योग्य नाही.धरणात पाणी साठा उपलब्ध असून रोज त्याची वाफ होऊन ते निरुपयोगी संपत आहे, जनतेला व गुरे ढोरे यांना प्यायला मिळाल्यास संबंधित अधिकारी पदाधिकारी व सरकार साऱ्यांना पुण्य मिळेल ते त्यांनी घेणे अपेक्षित आहे.पण तसे होताना दिसत नाही.

येत्या १७/०५/२०२३ बुधवार पर्यंत पाण्याचे आवर्तन न सोडल्यास गुरुवारी १८/०५/२०२३रोजी सकाळी ९:००वाजता रा.गलंगी ता. चोपडा जि.जळगाव येथे अनेर नदीच्या अलीकडे रास्ता रोको करण्यात येईल.असे निवेदन एस बी नाना पाटील,समन्वयक,शेतकरी कृती समिती चोपडा जी.जळगाव यांनी तहसीलदार चोपडा,पोलीस निरीक्षक,चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन
चोपडा,उपविभागीय अभियंता,अनेर मध्यम पाटबंधारे प्रकल्प शिरपूर यांना दिले आहे.