बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम;
यंदाही शंभर टक्के निकाल
चोपडा:-(प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात आला असून शहरातील अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय चोपडा यांचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून दरवर्षी प्रमाणे यंदाही विज्ञान शाखेचा १००℅ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेत 321विद्यार्थी प्रविष्ट होते विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यापैकी सर्वच 321 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.


त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेत 98 विद्यार्थी प्रविष्ट असून 98 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे कला विभागात 112 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असून 112 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत सदर शाळेतून 123 एवढे विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये आलेले आहेत तसेच प्रथम श्रेणी 189 एवढे विद्यार्थी प्रथम श्रेणीत आलेले आहेत तसेच जीवशास्त्र विषयामध्ये शंभर पैकी 98 मार्क पडून विद्यार्थिनी जीवशास्त्र विषयात प्रथम तसेच 90 च्या वरती 140 विद्यार्थ्यांनी जीवशास्त्रमध्ये गुण प्राप्त केलेले आहे सदर जीवशास्त्रच्या प्राध्यापिका ऐश्वर्या दीक्षित यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.

दरवर्षाप्रमाणे यामधील बहुतांशी विद्यार्थी एमबीबीएस, बीएएमएस, फार्मसी ,इंजीनियरिंग च्या नामांकित महाविद्यालयात पदवी मिळवतात प्रविष्ट होतात तसेच या कॉलेजमधील बहुतांशी विद्यार्थी चांगले डिग्री प्राप्त करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारचे पगार कमवतात तसेच सरकारी नोकरीमध्ये या महाविद्यालयाचे बरेचशे विद्यार्थी गेलेले आहेत सर्व दैदीप्यमान यश मिळवलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जी पाटील,उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दिपक जोशी संस्थेचे जेष्ठ संचालक डी. बी. पाटील कॉलेजचे व्यवस्थापक विजय दीक्षित तसेच प्राचार्य प्रीती सरवैया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले तसेच पुढील भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या…













