चोपड्याचे आमदार सौ.लताताई सोनवणे यांचा वाहनाला अपघात डंपर ने समोरून दिली धडक

चोपड्याचे आमदार सौ.लताताई सोनवणे यांचा वाहनाला अपघात डंपर ने समोरून दिली धडक

चोपडा तालुक्याचे आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात ते किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे आज आपल्या वाहनाने चोपडा तालुक्यातील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असतांना करंज गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारला एमएच १९ – झेड ६२४५ क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. यात वाहनाचे चे नुकसान झाले असून सोनवणे दाम्पत्यासह कारच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

सुदैवाने या अपघातात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी तेथे धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करण्याचे काम सुरू केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More