रा.प. महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन समारंभात राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या ९ आगारात चोपडा अगाराचा होणार स्तकार…

रा.प. महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन समारंभात राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या ९ आगारात चोपडा अगाराचा होणार स्तकार…

दि.०३रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात रा.प. महामंडळातील ३१ विभागांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणारे ०३ विभाग व २५० आगारांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणारे ०९ आगार यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष रा.प. महामंडळ यांचे हस्ते मध्यवर्ती कार्यालय स्तरावर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. रा.प. महामंडळातील सर्व विभाग व आगारांमधील ज्या विभाग आगारांनी वर्ष २०१९-२० च्या तुलनेत
आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत मूल्यांकन फलनिष्पत्तीतील २० परिमाणकांमधील (20 Points ) ०८ परिमाणामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली आहे असे ०३ विभाग व ०९ आगारांची गुणांकाच्या आधारे या सत्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात येणारे विभाग व आगार यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणारे ०३ विभाग आहेत त्यात
जळगांव,जालना,भंडारा ह्या तीन विभागातून
उत्कृष्ट कामगिरी करणारे ०९ आगार या १९ आगारांची चालविण्यात आलेल्या नियंतानुसार ०३ गटात वर्गवारी करण्यात आली आहे.

७० पेक्षा जास्त नियते असणारे आगाराचे नांव शहादा (धुळे विभाग),कराड (सातारा विभाग),बीड (बीड विभाग )
ते ७० पर्यंत नियते असणारे आगार अ.क्र. आगाराचे नांव(जालना विभाग),जामनेर (जळगांव विभाग ),चोपडा (जळगांव विभाग)
३५ पर्यंत नियते असणारे आगाराचे नांव
राळेगांव (यवतमाळ विभाग ), सोयगांव (छ. संभाजीनगर विभाग ) दिग्रस ( यवतमाळ विभाग )या अनुषंगाने कळविण्यात येते की. वरील नमुद केलेले विभाग व आगारांमध्ये सदस्थितीत कार्यरतअसणारे विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापक यांनी दि०३ रोजी होणा-या सत्कार समारंभासाठी मुंबई येथे हजर रहावयाचे आहे. विभागांनी संबंधीत आगार व्यवस्थापक यांना कळविण्यात आले असल्याची माहिती चोपडा आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दिली .

राज्यातील ९ उत्कृष्ट आगारांमध्ये आपल्या आगाराचा सत्कार होणार आहे व सदरचा सत्कार हा आपण सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळेच होणार आहे. विभाग नियंत्रक भगवान जगनोर,यंत्र अभियंता (चालन) अजय पाटील ,विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा व सर्व सहकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे चोपडा आगाराला मिळणार आहे सदरचा सन्मान हा सर्व चालक,वाहक, यांत्रिक,प्रशासकीय व पर्यवेक्षकीय सहकारी यांना समर्पित असल्याचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More