चोपडा शहरातील समर्थ ट्रेडर्स हार्डवेअर दुकानाचे शटर वाकून दोन लाख ९२ हजार रुपये रोकड घेऊन चोरटे पसार # एका महिन्यात तिसरी चोरी नागरिकांमध्ये भीती..

चोपडा शहरातील समर्थ ट्रेडर्स हार्डवेअर दुकानाचे शटर वाकून दोन लाख ९२ हजार रुपये रोकड घेऊन चोरटे पसार # एका महिन्यात तिसरी चोरी नागरिकांमध्ये भीती..

चोपड़ा शहरातील यावल रोडलगत एम. जी. कॉलेज जवळ बंधन के शेजारी असलेल्या गोपाल श्रीराम पाटील यांचा मालकीचे समर्थ ट्रेडर्स हार्डवेअरचा दुकानाचे सोमवारी पहाटे तीन अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. शटर वाकून अज्ञात चोरट्याने दुकानातून  दोन लाख ९२ हजार रुपये चोरून पसार झाले .याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच दुकान मालक गोपाळ पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के. के.पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मागील महिन्याभरात हा तिसरी चोरी असून अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे सामान्य जनमाणसात भीतीचे वातावरण निर्माण आहे. पुढील तपास एपीआय अजित सबाळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More