प्रताप विद्या मंदिरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
चोपडा प्रतिनिधी _ येथील प्रताप विद्या मंदिरात नवीन शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात दिमाखदार पद्धतीने स्वागत करण्यात आले.

ढोल ताशांच्या गजरात, पुष्प वर्षावात, गुलाब पुष्प देऊन नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. शाळेत सर्वत्र फुले, फुगे, रांगोळी आदींची सजावट असल्याने वातावरण उल्हासदायक आणि आल्हाददायक होते.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
यावेळी प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपप्रचार्य जे एस शेलार,पर्यवेक्षक एस एस पाटील, श्रीमती एम डब्ल्यू पाटील,पी डी पाटील, सर्व विभागातील शिक्षक बंधू भगिनी लेखनिक कर्मचारी आणि पालक यांची देखील उपस्थिती लाभली. पर्यवेक्षक एस एस पाटील आणि मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी आपल्या मनोगततून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक पंकज शिंदे यांनी केले.














