शेतकरी असल्याचे खोटे दाखले देऊन खरेदी  केलेल्या शेतजमिनी सरकार जमा # तलाठी व मंडळ अधिकारी यांचा संगनमताने झाले होते व्यवहार कार्यवाही होणार का?..

शेतकरी असल्याचे खोटे दाखले देऊन खरेदी  केलेल्या शेतजमिनी सरकार जमा # तलाठी व मंडळ अधिकारी यांचा संगनमताने झाले होते व्यवहार कार्यवाही होणार का?..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी

चोपडा महसूल विभागात होत असलेला अनागोंदी व्यवहार पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे कोरोना काळात मात्र महसूल कर्मचारी व अधिकारी आलेल्या मिळालेल्या संधीचा सोन करण्यात व्यस्त होत त्यातून खोटे दस्त सादर करून  शेतजमिनी चे व्यवहार करण्यात आले .त्या संधर्भात माजी नगरसेवक सुरेश शिरसाठ यांनी वेळोवेळी घडलेला प्रकार हा तहसीलदार अनिल गावित यांचा निदर्शनास आणून दिला होता .चोपडा तहसीलदार यांनी चौकशी केली असता शेतजमिनी खरेदी करण्यासाठी खोटे पुरावे सादर केले असल्याचे निष्पन्न झाले होते .
शेतकरी असल्याचे खोटे पुरावे सादर करून खरेदी केलेल्या शेतजमिनी सरकार जमा करण्याचा महत्त्वाचा निकाल चोपडा तहसीलदारांनी नुकताच दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी चोपडा आणि चौगाव शिवारातील काही शेतजमिनी शेतकरी नसलेल्या व्यक्तींनी खरेदी केल्याचे माजी नगरसेवक सुरेश शिरसाठ यांच्या निदर्शनास आले होते. त्यासंदर्भात कुळ कायद्याच्या कलम ८४क नुसार संबंधित खरेदी खते अवैध ठरवून या जमिनी सरकार जमा कराव्यात अशी याचिका त्यांनी चोपडा येथील तहसीलदार यांच्याकडे केली होती. या शेतजमिनी खरेदी करणाऱ्यांनी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे देऊन शासनाची फसवणूक करून संबंधित जमिनी स्वतःच्या नावे लावून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. कूळकायदा कलम ६३ अन्वये फक्त शेतकरीच शेतजमीन खरेदी करू शकतो, अशी तरतूद आहे. या प्रकरणी सुनावणी घेऊन, चौकशीअंती तहसीलदार यांनी इस्माईल इसाक बागवान, अनिल शांतीलाल जैन, ज्ञानेश्वर रामदास शिंदे, प्रकाश जैन आणि अनुप जैन यांची विविध खरेदी खते अवैध ठरवून संबंधित शेतजमिनी सरकार जमा करण्याचे अंतिम आदेश काढले आहेत. तक्रारदाराचे कायदेविषयक सल्लागार म्हणून अॅड. भूषण महाजन काम पाहत आहेत.

दरम्यान, या आदेशामुळे शहरात खळबळ उडाली असून याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. खोटे पुरावे सादर करून शेतजमीन खरेदी करणाऱ्यांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी प्रशासन गुन्हा दाखल करणार ? ज्या अधिकाऱ्यांनी हे सर्व प्रकार घडून आणले त्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर प्रशासन काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. असेच काही प्रकरण उजेळात आणणार असल्याची माहिती सुरेश शिरसाठ यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More