मद्यधुंद स्विफ्ट चालकाने चोपडा धरणगाव रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांना उडवले चार जण जखमी# झोडगे येथील दोन जणांना अटक…

मद्यधुंद स्विफ्ट चालकाने चोपडा धरणगाव रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांना उडवले चार जण जखमी# झोडगे येथील दोन जणांना अटक…

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
चोपडयाहून धरणगाव मार्गे झोडगे जात असताना पूर्णपणे मद्यधुंद असलेल्या आरोपी गंगाधर उर्फ हरीष नरेंद्र जोशी,भूषण भाईदास खांडेकर रा कुंभार वाडा झोडगे ता मालेगाव यांनी भरधाव वेगात दारूच्या नशेत  स्विफ्ट गाडी क्र- एम एच-०५- इ एल-१९५६  स्विफ्ट गाडी बेभान पणे चालवून चोपडा शहर पासून ते वेले गावापर्यंत रस्त्यावर  एकूण चार जणांना गाडीने उडवल्याची सिनेस्टाईल घटना आज रात्री साडे सात  ते आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

अपघातात उडवलेल्या मोटरसाकल

झोडगे ता मालेगाव  येथील एकूण चार जण दारूच्या नशेत चोपड्यात आले होते.त्यांनी दारूच्या नशेत कुंटणखान्या वर जाऊन दादागिरी केली असल्याचे समजते आणि लोहाणा पेट्रोल पंप च्या मागून चोपडा वेले रस्त्यावर जात असताना अगोदर श्रीनाथ प्राईड हॉटेल समोर मजरेहोळ गावचे शेतकरी व सालगडी समाधान मुरलीधर पाटील(४७) व दिनेश ताराचंद बारेला(३५) हे उभे होते यावेळी त्यांना ठोस देऊन आरोपी स्विफ्ट गाडी चालक पुढे पळून गेले आणि परत दहा मिनिटात त्याच गाडीने वेले गावाजवळ रामदास बाजीराव चौधरी (५७) सुरेखा रामदास चौधरी(४०)हे  चहार्डी गावाकडे मोटार सायकल ने जात असताना त्यांना देखील याच आरोपींनी गाडीची धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमींना प्राथमिक उपचार साठी चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले होते प्राथमिक उपचारानंतर जखमींना खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. सागर पाटील यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More