रोटरी क्लब ऑफ चोपडा व हरताळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने चोपडा रोटरी डायलिसिस सेंटरच शुभारंभ;#

समाजाची अपेक्षापूर्ती हेच रोटरीचे ध्येय
चोपड्यात डायलिसिस मशीन लोकार्पण प्रसंगी
डॉ.आनंद झुंनझुनवाला

चोपडा ( वार्ताहर ) – परिवारातील एक सद्स्य जर किडनी विकाराने त्रस्त झाला तर संपूर्ण परिवाराचे आर्थिक,मानसिक आरोग्य धोक्यात येत असते,जवळ पैसा असेल तर उपचार होऊ शकतात पण जर का आर्थिक स्थिती नाजूक असेल तर घरातला सदस्य आपल्या डोळ्या देखत मारतांना बघावे लागते यापेक्षा दुसरे दुर्दैव नसावे,याच गोष्टींचा विचार करून रोटरी क्लब सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे,समाजाची अपेक्षापूर्ती हेच रोटरी चे ध्येय असल्याचे मत आज डायलिसील सेंटर लोकार्पण प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल डॉ.आंनद झुंनझुनवाला यांनी व्यक्त केले.

चोपडा रोटरी क्लब आणि हरताळकर हॉस्पिटल,चोपडा यांच्या वतीने आज दि.२९ रोजी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत दोन डायलिसिस मशीन लोकार्पणाचा महत्वकांक्षी सामाजिक उपक्रम पार पडला.या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्याकळून एक डायलिसिस मशीन देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.आनंद झुंनझुनवाला ( प्रांतपाल रोटरी ) तर उद्घाटक म्हणून डॉ.विजय पोतदार,डॉ.विकास हरताळकर उपस्थित होते.अतिथी म्हणून डॉ.अमित भंगाळे,जळगाव येतील डॉ.राजेश पाटील,संदीप काबरा, चंद्रकांत सत्रा हजर होते.सदर डायलिसिस सेंटरचे प्रकल्प प्रमुख म्हणून संजीव गुजराथी,नितीन अहिरराव काम बघणार आहेत.

यात गरजू रुग्णांना नाममात्र सेवाशुल्क आकारून उपचार मिळणार आहेत,तसेच ज्या रुग्णांना ते ही शक्य नसेल त्यांचा खर्च रोटरी उचलणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी आशिष गुजराथी,चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी,जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल,माजी गटनेते जीवन चौधरी, ऍड.रवींद्र जैन,सुनील जैन,डॉ.विकास हरताळकर,डॉ.राजेंद्र भाटिया,डॉ.प्रेमचंद महाजन,डॉ.अमित हरताळकर,डॉ.विनीत हरताळकर,डॉ.लोकेंद्र महाजन,डॉ.सौ.नीता हरताळकर, सौ.जोत्स्ना हरताळकर, डॉ.मंगेश वैद्य,डॉ.दुर्गेश जैस्वाल,डॉ.दिपक चौधरी,डॉ.पराग पाटील,डॉ.आर.टी.जैन, डॉ.रवींद्र पाटील,डॉ.वैभव पाटील,रोटरी अध्यक्ष ॲड रुपेश पाटील,सचिव गौरव महाले,पंकज बोरोले,प्रवीण मिस्तरी,चेतन टाटीया,सौ.मोनिका झुंनझुंनवाला,आदी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.अमित हरताळकर,डॉ.विकास हरताळकर,डॉ.राजेश पाटील,डॉ.अमित भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले,प्रास्ताविक ॲड रुपेश पाटील यांनी तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More