चोपडा नगर परिषदेचा ई टेंडर उघडण्यास दिरंगाई बांधकाम विभागाचे अभियंता यांची माहिती देण्यास टाळटाळ… विकास कामाला लागला ब्रेक
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
चोपडा नगर परिषद येथील विकास कामांना लागला ब्रेक दि.12 मे रोजी काढण्यात आलेल्या ई निविदा प्रमाणे एकूण 12 कामा साठी निविदा मागवण्यात आल्या होत्या त्यात वित्तीय निविदा उघडण्याची दि.24 मे रोजी होती दिनांक उलटून एक महिना झाला असून सुधा अद्याप निविदा उघडण्यात आलेली नाही या बाबद बांधकाम अभियंता सचिन गावंदे यांना माहिती विचारली असता उडवा उडविचे उत्तर देत माहिती देण्यास टाळाटाळ करत मुख्य अभियंता माहिती देतील अस सांगून विषयाला बगल दिली या विषयी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्याशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तांत्रिक बोलीचा लिफाफा उघडले असल्याचे सांगत काही तांत्रिक अडचणी असल्या मुळे वित्तीय लिफाफे उघडले नसल्याचे सांगितले त्यांना ई टेंडर किती प्राप्त झाले असल्याचे विचारले असता ते गोपनीय असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले .


वित्तीय निविदा उघडण्याची मुदत उलटून एक महिन्या पेक्षा अधिक वेळ निघून गेल्यानंतर ही निविदा का उघडण्यात येत नाही ?यावर प्रशासक आणि ठेकेदार यांचात टक्केवारी चे गणित जुळत नाही का?म्हणून निविदा उघण्याचा महूर्त नगर पालिकेला सापडत नसल्याची चर्चा सध्या चोपडा शहरात रंगताना दिसत आहे.तसेच विकास कामाचे स्पर्धात्मक दर काही ठेकेदारांनी भरले आहे तर त्या ठेकेदारांना मेनेज करण्या करता शरतीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .यामुळे कोट्यवधीचा विकास कामांना ब्रेक लागल्याचे दिसून येते.तसेच हम करे सो कायदा या प्रमाणे प्रशासक चोपडा नगर परिषदेचे कामकाज चालवत आहे.
तरी वित्तीय ई निविदा लवकर उघडण्यात यावे व नियोजित विकास कामे त्वरीत व्हावीत अशी जनतेची मागणी आहे.













