देवेंद्र पाटील यांचे सेट परीक्षेत यश
चोपडा जि प मराठी कन्या शाळा नं.२ चोपडा येथे कार्यरत देवेंद्र भास्कर पाटील यांनी नुकतीच 23 मार्च 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सेट पात्रता परीक्षेत इतिहास विषय घेऊन यशस्वी झाले आहेत. देवेंद्र पाटील हे ग.स. सोसायटी जळगावचे माजी संचालक असून त्यांनी गेल्या वर्षी 2022 मध्ये झालेल्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातूनही पात्रता धारण केली आहे. सलग दोन्ही वर्षी त्यांनी सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रशिक्षणात राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले आहे. सोबतच ते विविध संस्था व संघटनांचे जिल्हास्तरावर पदाधिकारी आहेत. शिक्षण क्षेत्रात तील यांच्या या वाटचालीचे विविध क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.















