ललित कला केंद्र चोपडा येथील पायाभूत वर्ग व एटीडी प्रथम वर्षाचा १००% निकाल

ललित कला केंद्र चोपडा येथील पायाभूत वर्ग व एटीडी प्रथम वर्षाचा १००% निकाल

चोपडा:- येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत शासकीय उच्चकला परीक्षा 2023 चा निकाल मध्ये भगिनी मंडळ चोपडा संचलित ललित कला केंद्राचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यात पायाभूत वर्ग व ए.टी.डी. प्रथम वर्ष (कला शिक्षक पदविका ) अभ्यासक्रम वर्गातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होवून
या मध्ये पायाभूत वर्गातून कु.प्राप्ती अतुल पाटील (कर्कि ता.मुक्ताईनगर) ही प्रथम क्रमांकाने तर कु.आचल राजेश पाटील (निंबोल ता.रावेर) ही द्वितीय क्रमांकाने आणि नम्रता दिलीप सावकारे (चोपडा) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

तसेच ए.टी.डी. प्रथम वर्ष (कला शिक्षक पदविका) अभ्यासक्रम वर्गातील कु.तृप्ती तेजस शाह (चोपडा) ही प्रथम क्रमांकाने तर प्रमोद महेश वारुळे (पारोळा)हा द्वितीय क्रमांकाने आणि कु.दिव्या राजेश सैतवाल (जामनेर) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.

यात मुलींनी विशेष उत्तुंग भरारी यशस्वीरित्या बाजी मारल्याचे दिसून आले.
सर्व उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनमताई गुजराथी व सहसचिव सौ.अश्विनीबेन गुजराथी आणि उपप्राचार्य डाॅ.आशिष गुजराथी, शैक्षणिक शाखा प्रमुख, सर्व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव कौतुक करण्यात येत आहे. प्राचार्य सुनील बारी प्रा. विनोद पाटील प्रा. संजय नेवे व माजी प्राचार्य राजेंद्र महाजन व माजी प्रा.जी.व्ही.साळी,लिपीक भगवान बारी, शिपाई अतुल अडावदकर व प्रवीण मानकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More