समान नागरी कायद्याला आमचा विरोध# जैन साधूंची निर्घृण हत्या ही लज्जास्पद बाब; ऑल इंडिया बहुजन विकास पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन निकम…

समान नागरी कायद्याला आमचा विरोध# जैन साधूंची निर्घृण हत्या ही लज्जास्पद बाब; ऑल इंडिया बहुजन विकास पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन निकम…

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क

चोपडा ( वार्ताहर ) – ऑल इंडिया बहुजन विकास पार्टीची  स्थापना दि . ४ जुलै रोजी सुभेदारी गेस्ट हाऊस छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथून झाली असून चोपडा तालुका कऱ्यकरणीची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय सरचिटणीस पदी गोपाळ सोनवणे,चिटणीस डॉ.ओंकार बनकर , उपाध्यक्ष ऍड.नितीन कोळी,तालुकाध्यक्ष बंटी वाघ आदींच्या नियुक्त्या आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन निकम यांनी जाहीर केल्या.भारतीय बहुजन समाज पार्टी ही ८५ टक्याचा वर असलेल्या बहुजन समाजाला संघटित करणार असून महाराष्ट्रात स्थापित पार्टीचा विस्तार करणार असल्याचे पार्टीची सभासद नोंदणी ही संभाजीनगर येथून सुरवात करण्यात आली आहे .

लवकरच संपूर्ण भारतात  गतीने सभासद नोदणी करून येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या स्वबळावर लढणार असल्याची माहिती देत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशहा पद्धतीकडे वाटचाल सुरू असून देशात अल्पसंख्याक ,ओबीसी,एस.सी. एस.टी.एन्टी,कोणीच सुरक्षित नाही,भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा लपून राहिलेला नसून सेक्युलर भारताला ते हिंदुराष्ट्र घोषित करण्याच्या तयारीत आहेत .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची छेडछाड करून समान नागरी कायदा ते आणू पहात आहेत. त्यांच्या या समान नागरी कायद्याला आमचा विरोध आहे असे मत ऑल इंडिया बहुजन विकास पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन निकम यांनी व्यक्त केले.ते येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


पत्रकारांशी संवाद साधतांना निकम म्हणाले की आज देशात असुरक्षितता आहे,जैन साधूंची निर्घृण हत्या होतेय,आदिवासी माणसावर लघवी करण्यासारखी लज्जास्पद घटना घडतेय,शांतता सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे,मणिपूर पेटलाय दलित,मुस्लिम, अल्पसंख्याक,आदिवासी सुरक्षित नाहीत,
ज्या राष्ट्रपुरुशांनी देश घडवलाय,त्यांच्या पुतळ्यांची विटंबना केली जाते,असाही आरोप भारतीय बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन निकम यांनी केला.पत्रकार परिषदेत परिषदेत केला यावेळी  सतीशवाडे,दिवानजीसाळुंखे ,वसंत पुजारी, प्रवीण करंकाळ,अतुल साळुंखे,नाना साळुंखे, मुकेश बागुल,यांच्यासह महीला पदाधिकारी अनिता बाविस्कर,अनिता वारडे,दीपाली सोनवणे,इंदूबाई शिरसाठ,उषाबाई कोळी,आदी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More