नागलवाडी – माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेत मुलींना मोफत ७७ सायकल वाटप.

नागलवाडी – माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेत मुलींना मोफत ७७ सायकल वाटप.
       मानव विकास संसाधन अंतर्गत इ.८ वी ते इ.१० चे शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरून शाळेत ये-जा करण्यासाठी मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आले.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर चोपडा एज्युकेशन सोसायटी संस्थेचे चेअरमन आदरणीय राजाभाई मयूर तसेच संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ.शैलाबेन मयूर उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल सचिव आदरणीय माधुरीताई मयूर संचालक . चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी,ज्येष्ठ सभासद ,रमेशभाई जैन,प्रा.आर.बी.गुजराथी सर, प्रवीणभाई गुजराथी, नागलवाडी ग्रामपंचायत उपसरपंच ,सचिन भाऊ पाटील,सदस्य गोपाल पाटील,श्रीकांत पाटील,महिला सदस्या लिलाबाई पाटील,सौ.अरुणाबाई पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच आदरणीय धरमदास आण्णा ,विकास सोसायटीचे चेअरमन आदरणीय भरत रामसिंग पाटील, महाराणा पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पाटील नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विश्वनाथ जी. पाटील सर, संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी,उल्हासभाई गुजराथी,डी.टी महाजन सर, प्रताप विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेचे आजी माजी मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक सर्व पर्यवेक्षक संस्थेच्या इतर शाखांचे अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक शाळेचे मुख्या.आर.बी.पाटील सरांनी केले .संस्थेचे संचालक चंद्रहासभाई गुजराथी ,सचिव आदरणीय माधुरीताई मयूर,माजी सरपंच श्री धरमदास आण्णा यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन एस डी पाटील, दीपक राजपूत व आभार नवनीत राजपूत यांनी मानले. शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More