चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश #मुद्देमाल जप्त …

चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात आरोपी अटक व मुद्देमाल जप्त केल्याबाबत

दि. ११ रोजी साडे सहा ते पावणे सात वाजेच्याच्या दरम्यान महालक्ष्मी नगर चोपडा येथील राहणारी एक महीला पायी फिरत असतांना एका मोटार सायकलवर दोन अज्ञात इसम आले व त्यांनी सदर महीलेच्या गळ्यातुन सुमारे ३३ ग्रॅम वजनाची व अंदाजे एक लाख ३२हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरीने हिसकावुन धरणगांवच्या दिशेने पळुन गेले होते.

सदर घटनेची पोलीसांना माहीती मिळताच कृषीकेश रावले सहा.पोलीस अधिक्षक चोपडा भाग चोपडा तसेच आम्ही स्वता व सपोनि संतोष चव्हाण पोउनि घनशाम तांबे. पोहेकॉ विलेश सोनवणे, पोकों. मिलींद सपकाळे व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून फिर्यादी यांना घटनेबाबत सविस्तर विचारपुस करुन तात्काळ धरणगांव रोड शिरपुर रोडवर नाकाबंदी करुन आरोपींचा वेले निमगव्हाण गावा पर्यंत शोध घेतला तसेच फिर्यादी व साक्षीदार यांनी सांगीतलेल्या वर्णनाप्रमाणे सुतगिरणी येथील सि.सि.टि.व्ही कॅमेरे चेक करुन संशयीत आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु आरोपींबाबत कोणतीही उपयुक्त माहीती मिळाली नव्हती

त्यानंतर सदरचा गुन्हा हा वरला व सेंधवा मध्यप्रदेश या ठिकाणी राहणाऱ्या आरोपींनी केल्याबाबत माहीती मिळाल्याने तात्काळ सपोनि संतोष चव्हाण पोना संतोष पारधी, पोकॉ. लव सोनवणे यांचे पथक सेंधवा येथे रवाना करुन सेंधवा ग्रामीण पोलीसांच्या मदतीने आरोपी कुवरसिंग गंगाराम खरते वय २३ रा.गुडागांव ता.वरला जि.बडवाणी (मध्यप्रदेश), सियाराम पांडीया जुकटे वय १९ रा. कुडवाझिरा ता. सेंधवा जि.बडवाणी (मध्यप्रदेश) या आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्या कडुन सदर गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील जबरीने चोरुन नेलेली सोन्याची पोत कि. अं.एक लाख ३२ हजार-रु व आरोपींनी गुन्हा करतांना वापरलेली मोटार सायकल ५०हजार किमतीची मोबाईल फोन कि. अंदाजे पाच हजार रुपये असा एकुण एक लाख ८७ हजार रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन सदर आरोपीतांना मा.न्यायालयाने

दि. १७ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे सदर गुन्ह्यातील अटक आरोपीतांनी यापुर्वी लासलगांव नाशिक ग्रामीण तसेच पुणे शहर व पाचोरा तालुक्यात देखील मजुरी काम केलेले आहे त्याठिकाणी देखील आरोपीतांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता सदर गुन्ह्यातील अटक आरोपीतांना सखोल विचारपुस करुन इतर आणखी काही गुन्हे केलेले आहेत का याबाबत तपास सुरु आहे

पोलीस अधिक्षक राजकुमार जळगांव यांच्या आदेशान्वये व मा. रमेश चोपडे साहेब अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव व कृषीकेश रावले सहा. पोलीस अधिक्षक चोपडा भाग चोपडा यांच्या मार्गदर्शना खाली सदर गुन्हयाचा तपास चोपडा पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सपोनि संतोष चव्हाण व पोहेकॉ. प्रदीप राजपुत व पथक हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More