बोगस शिक्षक भरती प्रकरणी अँग्लो उर्दू हायस्कूलचा तीन संचालकांसह एका शिक्षकावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

बोगस शिक्षक भरती प्रकरणी अँग्लो उर्दू हायस्कूलचा तीन संचालकांसह एका शिक्षकावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी

फिर्यादी चिरागोद्दिन इजाबोद्दिन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत सन २०१२ मध्ये शाळा अध्यक्ष व समितीने ७ शिक्षकांची भरती केली होती त्यात अजहरोद्दीन जहिरोद्दीन व इतर-६ या शिक्षकांचा देखिल समवेश होता. त्यानंतर पुन्हा सदर आरोपींनी सन २०१४ मध्ये शिक्षक भरती केली, त्यात  सोबत इतर ४ शिक्षकांची भरती केली होती सदर भरती ता.१६/०६/२०१४ पासुन आरोपी शे.मोहसीन शे. हशम यांनी भरती बाबत खोटे कागदपत्रे तयार करुन  दि.२४/१२/२०१२ पासुन भरती केल्याचे खोटे दर्शविले व खोटे दस्तएवजाचे आधारे आरोपीतांनी शे.मोहसीन शे.हशम यांची शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची मान्याता घेतलेली आहे.


सबब आरोपीनी संगणमताने लबाडिने व बेईमानिने खोटे दस्तएवज तयार केलेले आहे. त्यामुळे सरकारचे मुकसान केले आहे. व त्यांची अंमलबजावणी केली आहे, तसेच बनावट दस्तएवजांचा वाईट हेतुने सरकारला फसवण्यासाठी उपयोग केला आहे. तसेच बेईमानिने व लबाडिने बनावट दस्ताची जाणीव असतांना हेतु पुर्वक शिक्षण अधिकारी यांचे कडे देवुन शे.मोहसीन शे.हशम यांची मान्यता मिळविली आहे. सदर आरोपीनी जा.क्र.१२४/२०१२-२०१३चे नियुक्ती पत्र (order of appointment) अजोहरोद्दीन जहीरोद्दीन यास दिले होते व त्याच जावक क्रमांकाने पुन्हा शेख मोहसिन शे. हषम यास नियुक्ती पत्र दिले आहे व या खोट्या दस्तएवजाचे आधारे शिक्षणअधिकारी जळगाव यांचे कडुन तारीख २७/०८/२०१४ रोजी खोटे दस्त सादर करुन मान्यता घेतली आहे

  या प्रकरणी मुस्तफा इजुकेशन सोसायटी चोपडा संचालित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल येथे स्वयंघोषित अध्यक्ष असगरअली सैय्यद , अब्दुल सत्तार एनोद्दिन,लियाकतअली सैय्यद नुर या तीन संचालकांसह शिक्षक शे.मोहसीन शे. हसम यांनी संगनमताने बनावट दस्तावेज तयार करून शिक्षक भरती केल्याप्रकणी मे.कोर्टाने दि.१५/७/२०२३ आदेशाने भादवी कलम४६३’४६४’४६५,४६८, व ४७१ सी.आर पी.सी.कलम१५६(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्याचा तपास चोपडा पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांचा मार्गदर्शनाखाली सपोनी.संतोष चव्हाण करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More