गुंजन एजन्सी तर्फे राजेंद्र पाटील यांचा सत्कार…

गुंजन एजन्सी तर्फे राजेंद्र पाटील यांचा सत्कार

चोपडा ( वार्ताहर ) – शहरातील सामाजिक कार्यात आघाडीवर असणारे गुंजन एजन्सीचे संचालक राजेंद्र पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नुकतेच जळगाव येथे सप्तरंग इव्हेंट्स आणि सप्तरंग मराठी चैनल यांच्या माध्यमातून खानदेश भूषण 2023 तसेच खानदेश ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राजेंद्र पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मराठी सिने अभिनेते विजय पाटकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.हा देखणा सोहळा नुकताच जळगाव येथे संपन्न झाला याचे ओचित्य साधत चोपडा येथील गुंजन एजन्सी परिवारातील संचालक व कर्मचारी वृद्धांच्या वतीने आज दिनांक १८ रोजी राजेंद्र पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन पारिवारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी एजन्सीच्या संचालिका सौ अर्चना राजेंद्र पाटील,राजेंद्र पाटील ( दाजी ) जी बी शिंदे, जगदीश पाटील,राहुल राजपूत,मिलिंद पाटील सुनील पाटील,शाहरुख शेख नजीर,विकास देशमुख,भाईदास कोळी,विठ्ठल पाटील,जी.व्ही. चौधरी,मिलिंद कोळी,पंकज पाटील,शुभम चौधरी, राहुल पाटील,विकी जैन,चेतन मराठे आदी सदस्य हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More