चोपडा तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा डॉ.बारेलांचे
सा.बा.विभागाला निवेदन

चोपडा तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा डॉ.बारेलांचे
सा.बा.विभागाला निवेदन


चोपडा ( वार्ताहर ) – तालुक्यासह शहराच्या सर्वच
रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, रस्यात खड्डे खड्ड्यात रस्ते कळायला मार्ग नाही.या संदर्भात आज दि.३१ रोजी डॉ.चंद्रकांत बारेला मित्र परिवाराच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे
उपकार्यकारी अभियंता वीरेंद्र राजपूत यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हंटले आहे की,तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून,खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे,एक महिन्यापूर्वी केलेल्या कामांची सुध्दा दुरावस्था झाली आहे,तालुक्यातील रस्त्यांच्या संदर्भात येत्या दहा दिवसांत योग्य तो निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर डॉ.चंद्रकांत बारेला
यांच्यासह मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More