लोक कल्याण सेवा परिषद महा -राज्य यांची निवेदनाद्वारे मागणी
राष्ट्रद्रोहीकृत्य करणाऱ्या मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर
राजद्रोह अंतर्गत गुन्हा दाखल करा
चोपडा (प्रतिनिधी) :-लोक कल्याण सेवा परिषद यांची मागणी आहे की संभाजी नावाचा एक किडा संबंध महाराष्ट्रात राष्ट्रविरोधी सतत गरळ ओकत असतो हा किडा सन २०१४ पासून सातत्याने कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करीत आहे.

महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांना व तरुण मुलांचे माथे भडकविण्याचे व महापुरुष, देशविरोधी वादग्रस्त व्यक्तव्य करीत असतो या पूर्वी त्याने भीमा कोरेगाव दंगल घडविण्यात मोठा पुढाकार घेतला होता स्थानिक लोकांचे असेच माथे खराब केले होते त्या दंगलीतील क प्रकरणातील आरोपी आहे व महाराष्ट्रातील अनेक दंगलीत मुख्य आरोपी आहे याने नुकतेच भारताचा राष्ट्रध्वज वरून देशाच्या तिरंगा झेंडयाचा अपमान केला तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरही खालच्या पातळीवर त्यांच्या वैयक्तिक जीवनावर व आईच्या चारित्रावरून निंदणीय वक्तव्य केले तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या बद्दल गरळ-ओकली सतत न्यायपालिका व कार्यपालिका सरकार विरोधी तसेच हिंदु मुस्लीम दलित विरोधी वक्तव्य करून भारतीय संविधानाचा अपमान करणारे संभाजी किडेवर राष्ट्रद्रोही कृत्ये सतत करणान्या प्रकरणी राजद्रोही कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करावी आणि त्याला संबंध महाराष्ट्रातून हद्दपार करून महाराष्ट्रात प्रतिबंधात्मक कारवाही सरकारने करावी ही मागणी लोक कल्याण सेवा परिषद महाराष्ट्र राज्य करीत आहे.

तसेच येणाऱ्या काळात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाही न झाल्यास मुख्यमंत्री य उपमुख्यमंत्री यांच्या निवास स्थानी आक्रमक निर्देशेने, आंदोलन करण्यात येतील असा इशारा निवेदना व्दारे देत आहोत याची नोंद सरकारने घ्यावी. असे आशयचे निवेदन मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देतांना पदाधिकारी मा. वसंतजी शिंदे, महासचिव मा. पवन पारधी प्रदेशध्याक्ष मा. सुजित बागुल सरचिटणीस मा. शशिकांत कठरे मा. अजय पारधी मा. प्रथम पारधी मा. ऋषिकेश सुखदेव उपस्थित होते













