आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपवलेले कधीही चांगले विटनेर येथील तरुणांनी केला निर्धार
ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचा पुढाकार…

आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपवलेले कधीही चांगले विटनेर येथील तरुणांनी केला निर्धार
ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचा पुढाकार..


चोपडा :-(प्रतिनिधी ):-तालुक्यातील विटनेर ग्रामपंचायत ने व्यसन मुक्तीकडे वाटचाल सुरु केली आहे. गाव शंभर टक्के व्यसन मुक्त करण्याचा निर्धार गावातील तरुणांनी तसेच ग्रामपंचायत ने घेतला आहे.व्यसणामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जाऊन संसाराची राखरांगोळी करून घेतात.मादक पदार्थाच्या आहारी जाऊन थोड्या वेळ झिंग येते, विचार शक्ती नष्ट होते,मनुष्य नशेच्या आहारी जातो आणि आयुष्य खराब करून घेतो.म्हणून विटनेर गावातील तरुण आणि ग्रामपंचायत विटनेर च्या माध्यमातून विटनेर गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

माझे गाव व्यसनमुक्त गाव असा सहा महिन्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात ,माझं गाव व्यसनमुक्त गाव , माझा वार्ड व्यसनमुक्त वार्ड , माझा परिवार व्यसन मुक्त परिवार अशा तीन टप्प्यात उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. यासाठी गावातील महिला व तरुणांनी मेहनत घ्यायची शपथ घेतली आहे. यावेळी फलक अनावरण प्रांत महादेव खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या निरीक्षक कावेरी कमलाकर देखील उपस्थित होते

त्यांनी देखील जोपर्यंत मी इथे रुजू राहील तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेल असा शब्द त्यांनी गावाकऱ्यांना दिला . यावेळी अनेक महिलांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. या कार्यक्रम साठी सरपंच कविता पाटील उपसरपंच यमुनाबाई कोळी ग्रामपंचायत सदस्य निलेश रायसिंग, देविदास रायसिंग, किशोर कोळी, मंगल चौधरी, ग्रामसेवक रविंद्र महाजन तलाठी आर के पाटील कोतवाल भावलाल कोळी कुलदीप कोळी आदींनी सहकार्य केले. यावेळी या पूर्ण नियोजनात अध्यात्मिक बाजू सांभाळण्यासाठी ह. भ. प. महंत सुशील महाराज यांनी जबाबदारी घेतली ही संकल्पना दीपक भानुदास पाटील यांनी मांडली असून त्यासाठी सर्व गावकरी प्रयत्न करणार आहेत. यावेळी व्यसनमुक्ती जिल्हा बोर्डाचे सदस्य मोहम्मद शिकलकर यांनी गावाकऱ्यांना कुठलेही आज पासून कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही अशी शपथ दिली.या कार्यक्रमासाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More