चोपडा आगाराच्या प्रथमच महिलेच्या हाती स्टेरिंग
आगार प्रमुख सह ठिकठिकाणी महिला वाहकाच्या स्वागत…..!

चोपडा आगाराच्या प्रथमच महिलेच्या हाती स्टेरिंग
आगार प्रमुख सह ठिकठिकाणी महिला वाहकाच्या स्वागत…..!


चोपडा (प्रतिनिधी) —आजच्या युगात महिला पुरुषाच्या खांदाला खांदा लावून काम करत आहे कोणत्याच क्षेत्रात महिला वर्ग मागे नाहीत याची प्रचिती रोजच्या जिवनात दिसतं असते.


धका धकीच्या जीवनात देखील आपले घर सांभाळून पुरुषांच्या बरोबरीने काम करत दिसतात तालुक्यातील अबांडे येथील सुनीता भालेराव हे आगारात पहिल्यांदाच
महिला वाहक आल्याने बघ्याची एकच गर्दी झाली आहे. सुनीता भालेराव नामक महिला वाहक नवीनच प्रशिक्षण घेऊन चोपडा आगाराला नियुक्ती झाली नियुक्त झाल्यावर त्यांनी प्रथमच खेडीभोकरी ड्युटी केली. अत्यंत सामान्य कुटुंबातील सुनिता भालेराव यांनी यांनी जेमतेम शिक्षण पूर्ण करून बसचे स्टेरिंग हातात धरले. त्यांचे येथिल आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले त्यासह अनेक प्रवाशांसह गोरगावले येथील महिलांना सुनीता भालेराव यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More