
चोपडा(प्रतिनिधी) – कोविड १९ व्हायरसने जिल्ह्यात थैमान घातले आहे.त्याचा प्रादुर्भाव अडावद येथे झाला असून दोन रुग्ण मृत झाले असून एक रुग्ण विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे.कोरोनामुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले आहे.सामान्य नागरिक या व्हायरसला बळी पडू नये म्हणून शासन प्रयत्न करीत आहे.जनतेने घरीच राहण्याचा आग्रह देखील धरला जात आहे.त्यादृष्टीने शहर व तालुक्यात प्रशासन कसोशीने प्रयत्न करुन उत्तमोत्तम व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहे.या कामकाजाचा आढावा रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी आज चोपडा भेटीनिमित्ताने घेतला.अडावदमध्येच कोरोनाचे रुग्ण आढळुन येत असल्याने प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती खा.खडसे यांनी जाणून घेतली.तसेच अधिकाऱ्यांना काही सुचना देखील दिल्या.यावेळी तहसीलदार अनिल गावित,गटविकास अधिकारी कोसोदे,तालुका वैद्यकिय अधिकारी डॅा.लासूरकर,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॅा.मनोज पाटील, प्रभारी पोलीस निरिक्षक मनोज पवार,आराक,तांदळे,भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, जिल्हा चिटणीस राकेश पाटील, नाशिक विभाग ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.पाटील – म्हाळके परिवाराचे सांत्वन दरम्यान खा.रक्षाताई खडसे यांनी माजी आमदार व कॅाग्रेसचे जेष्ठ नेते स्व. डॅा. सुरेश पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपूत्र जिल्हा कॅाग्रेस अध्यक्ष अॅड.संदीप पाटील परिवाराची भेट घेवून सांत्वन केले.तसेच भाजपचे जेष्ट नेते माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके यांचे बंधू स्व.दिलीप म्हाळके यांचे नुकेतच निधन झाले.म्हाळके परिवाराचे देखील खा.खडसे यांनी सांत्वनपर भेट घेतली.












