मुकेश पाटील यांना पी.एच.डी.पदवी प्राप्त

मुकेश पाटील यांना पी.एच.डी.पदवी प्राप्त


महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागात कार्यरत असलेले श्री. मुकेश भाईदास पाटील यांनी डॉ. शैलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली “Changing Land Use Patterns with Urban Sprawl in Jalgaon District” (जळगाव जिल्ह्यातील शहर विस्तारीकरणासह बदलणारे भूमी उपयोजनाचे आक्रुतीबंध) या विषयावर संशोधन कार्य पुर्ण करुन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी, सर्व उप प्राचार्य रजिस्ट्रार व सहकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुकेश पाटील हे पंचायत समितीचे सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक भाईदास साहेबराव पाटील यांचे चिरंजीव व दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज पाटील यांचे लहान बंधू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More