
चोपडा( प्रतिनिधी) आजची सकाळ तालुका वासियांसाठी वाईट बातमी घेऊन आली असून काल रात्री उशिरा अजून १४ रुग्ण बाधित आढळून आले आहे.काल संध्याकाळी ७ बाधित आढळून आल्यानंतर रात्री उशिरा १४ बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. काल एकूण २१ रुग्ण आढळून आले आहेत. मागील दोन दिवसातच एकूण ४० रुग्ण आढळून आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर अमळनेर चे मालेगाव होते की अशी भीती अनेकांना आहे. तसेच शहरात रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे शहराचा आणि ग्रामीण भागाचा संपर्क तोडावा, अशी जोरदार मागणी होत आहे.हे नवीन रुग्ण आम्लेश्र्वर नगर, माळी वाडा, इस्लाम पुरा भागातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नागरिकांनी हलक्यात घेऊ नये आपली एक चूक आपल्या परिवाराला, परिसराला पर्यायाने गावाला महागात पडू शकते.












