चोपडा तालुक्यातील उत्तमनगर येथे शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल #७९५ किलो ओला गांजा जप्त

चोपडा तालुक्यातील उत्तमनगर येथे शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल #७९५ किलो ओला गांजा जप्त

चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील उत्तमनगर येथील रहिवासी रवी किलाऱ्या पावरा(२५) याच्या तुरीच्या शेतातमध्ये गांजाची शेती केल्याची माहिती मिळाली.त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी शेतात धाड टाकत शेतातून जवळपास १० क्विंटल दोन ट्रॅक्टर ओला गांजा जमा केल्याची कारवाई दि २४ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास केली आहे.

यात आरोपी सोबत पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.जमा केलेल्या जवळपास ७९५ किलो ओल्या गांजाची किंमत प्रती किलो ४००० रुपये प्रमाणे ३१८०००० तालुक्यातील उत्तम नगर येथे रवी किलाऱ्या पावरा (२५) याने तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास मिळाली.

त्याआधारावर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत शेतात दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शेतात धाड टाकली. यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेले ओली गांजाची झाडे कापून सुमारे १०क्विंटल वजन असलेला दोन ट्रॅक्टर गांजावर पोलिसांनी कारवाई करत जमा केला आहे.

त्यानंतर नायब तहसिलदार सचिन बांबळे यांनी पंचनामा केला तर सरकारी पंच म्हणून कनिष्ठ अभियंता बालाजी दहीफळे यावेळी उपस्थित होते.सदर कारवाईत रवी किलाऱ्या पावरा फरार झाला असून त्याचा अल्पवयीन भाऊ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवालकर,ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर,सहा फौ. देविदास ईशी,
पोहेकॉ राकेश पाटील,किरण पाटील,पोकॉ रावसाहेब पाटील,प्रमोद पारधी,विशाल जाधव,दिलीप पाटील आदींनी केली आहे.गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More