अवैधरितीने होणारी गुरांची वाहतूक अडवल्याचा रागातून चोपडा सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे यांच्यावर हल्ला #८जणांवर गुन्हा दाखल ५ आरोपींना अटक

अवैधरितीने होणारी गुरांची वाहतूक अडवल्याचा रागातून चोपडा सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे यांच्यावर हल्ला #८जणांवर गुन्हा दाखल ५ आरोपींना अटक

चोपडा शहरात शेतपुरा भागात जाणा-या जुना यावल रोडवर नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ सार्वजनीक रोडवर अवैद्यरित्या करीत असलेल्या गोवंश जातीच्या जनावरांच्या वाहतुक करणा-या लोकांवर पोलीस कारवाई करीत असतात याथा राग मनात धरून सपोनि अजित सावळे व पोहेकाॕ संतोष पारधी यांना लाकडी काठीने मारहाण करत शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जखमी पोलिस निरीक्षक अजित सावळे

सपोनि अजित सावळे यांच्या फिर्यादीवरुन दिनांक ०१ रोजी रात्री ११:०० वा सुमारास चोपडा शहरात शेतपुरा भागात जाणा-या जुना बावल रोडवर नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ सार्वजनीक रोडवर आरोपी नामे शेख साजीद शेख सलीम कुरेशी,शेख सऊद शेख सलीम कुरेशी,शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी,झियाऊद्दीन गयासुद्दीन काझी,शेख इब्राहीम शेख हमीद कुरेशी,शेख नाजीम शेख युनुस,शोएब सलीम कुरेशी,रईस रज्जाक कुरेशी सर्व रा सानेगुरुजी वसाहत चोपडा व इतर १० ते १५ लोकांनी सदर ठिकाणी गैरकायदयाची मंडळी जमथुन ते कत्तल करण्यासाठी अवैद्यरित्या करीत असलेल्या गोवंश जातीच्या जनावरांच्या वाहतुक करणा-या लोकांवर पोलीस कारवाई करीत असतात याचा राग मनात धरुन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून धक्का बुक्की करुन लोखंडी फायटरने यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन फिर्यादी व पोहेको संतोष पारधी व लाकडी काठीने मारहाण करुन फिर्यादी असे करीत असलेल्या शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून चोपडा शहर पोलिस स्टेशनला भादवीकलम३०७,३५३,३३२१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०६,४२७,१०९, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आठ आरोपी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी चा शोध सुरू असल्याची माहिती चोपडा पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी दिली
पुढील तपास पोनि के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि घनश्याम तांबे हे करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More