ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिक्षण घेतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा :–गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील

ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिक्षण घेतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा :–गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील


चोपडा येथे (स्व.) शरदचंद्रिका पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थिनींना गणवेष वाटप ..!
चोपडा :–
महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण मंत्री (स्व.) आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांनी सातपुडा पर्वत रांगा मधील
अतिशय दुर्गम भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ केली,गोरगरिबांच्या दाराशी शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शैक्षणिक संस्था उभ्या केल्यात त्यांचे
कार्य महान असून ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिक्षण घेतो त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांनी केले.
येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात गरीब व होतकरू विद्यार्थिनींना गणवेष व शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते.


व्यासपीठावर पंचायत समितीचे तज्ज्ञ शिक्षक प्रशांत सोनवणे,मुख्याध्यापक एस एल पाटील,श्रीमती आर सी शिरसाळे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कस्तुरबा महिला समाज संस्थेच्या संस्थापिका महाराष्ट्राच्या माजी शिक्षण मंत्री (स्व.) आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एल पाटील यांनी केले.यावेळी विद्यालयातील १७ विद्यार्थिनींना गणवेष व शैक्षणिक साहित्य गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


उपशिक्षक जयेश पाटील यांनीही माहिती विषद केली तर संचलन डी ए महाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More