प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील गणेश दीपक महाजन या खेळाडूचा राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम, तर प्रज्ञा महाजन हिचा चतुर्थ क्रमांक…,गणेश महाजन ची राष्ट्रीय स्तरावर निवड…

प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील गणेश दीपक महाजन या खेळाडूचा राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम, तर प्रज्ञा महाजन हिचा चतुर्थ क्रमांक…,गणेश महाजन ची राष्ट्रीय स्तरावर निवड…



प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील वेटलिफ्टिंग खेळातील 19 वर्षे वयोगटाचा खेळाडू गणेश दीपक महाजन (12वी सायन्स)याने नुकत्याच ठाणे या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शासकीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा प्रकारामध्ये 102 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावित प्रथम क्रमांक मिळविला. तर प्रज्ञा विनायक महाजन(12वी आर्टस) हिने 64 किलो वजनी गटात चतुर्थ क्रमांक पटकाविला. गणेश याने 102 किलो वजनी गटामध्ये 88 किलो स्नॅच व 108 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 196 किलो वजन उचलून गटात प्रथम क्रमांक मिळविला.

सदर गणेश याने मागील वर्षी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल पटकाविले होते. तरी यावर्षीच्या प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी व राष्ट्रीय स्पर्धेत पात्र होण्यासाठी गणेश याने वर्षभर कसून सराव केला. आपल्या शाळेचे, पालकांचे व शिक्षकांचे नाव उंच करीत सदर गणेश महाजन हा पुढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करेल.


गणेश याला प्रताप विद्यामंदिर क्रीडा विभाग प्रमुख शसाहेबराव एस.पाटील (आप्पा सर) व क्रीडा शिक्षक श्री. नरेंद्र एन. महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर वरील दोघेही खेळाडू यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष , चेअरमन,सचिव सर्व पदाधिकारी तसेच संस्थेचे समन्वयक आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्याक, उपप्राचार्य,पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More