चोपडा प्रांताधिकारी बंगाळे यांच्या खाजगी वाहनावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक..# प्रांताधिकारी बालंबाल वाचले,# आरोपीला अटक

चोपडा प्रांताधिकारी बंगाळे यांच्या खाजगी वाहनावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक…#प्रांताधिकारी बालंबाल वाचले,
पळून जाण्याचा होता इरादा



चोपडा प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वाळू भरलेल्या ट्रॉलीसह खडगाव तालुका चोपडा येथून जात असताना प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे स्वतः त्यांचे खाजगी वाहन (MH 20 FY 0216)चालवून पत्नी आणि मुलगी यांचेसह जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यालयीन मीटिंग आटोपून दुपारी 3.30 वाजता चोपडा येथे परत येत होते. तेंव्हा खाडगाव येथे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना त्यांच्या खाजगी वाहनातून सांगितले की, सदर ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू आहे.

प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे

तुम्ही त्या ट्रॅक्टर चालकास थांबवा. त्यावरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा तलाठी पावरा यांनी पाठलाग केला. तलाठी पावरा यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्याचे सांगितले असताही ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे याने ट्रॅक्टर थांबवले नाही. उलट तलाठी गुलाबसिंग पावरा यांना शिवीगाळ करून तू साईडला झाला नाही तर तुला उडवून देईन अशी धमकी देऊन ट्रॅक्टर पळून नेण्याचा इराद्यात होता. त्यातच प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय बंगाळे यांनी त्यांच्या खाजगी वाहनाचा वेग वाढवून सदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले व तलाठी गुलाबसिंग पावरा यांनीही मोटरसायकल वरून सदर अवैध वाळू वाहून नेणारा ट्रॅक्टर ला ओव्हरटेक केले व ट्रॅक्टरच्या पुढे मोटरसायकल उभी केली आणि प्रांताधिकारी बंगाळे यांनी त्यांचे खाजगी वाहन ट्रॅक्टर पुढे उभे केले तर त्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने राजेश विकास मालवे (वय 23 राहणार खरग तालुका चोपडा) याने धडक दिली. त्यात प्रांताधिकारी बंगाळे हे बालबाल बचावले.

त्यात प्रांताधिकारी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून वाहनाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय बंगाळे (वय 32) यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक व मालक पूर्ण नाव माहिती नाही यांच्या विरोधात कलम 353, 332, 379, 504, 506, 427 व महसूल अधिनियम कलम 48 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक आरोपी चोपडा ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात घेतला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.

महसूल कार्यालयातील तहसीलदार भाऊसाहेब थोरात व नायब तहसीलदार सचिन बांबोडे व इतर कर्मचारी गुन्हा दाखल करतेवेळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More