किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा केला खून, धनवाडी शिवारात शेतात केली हत्या..

किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा केला खून, धनवाडी शिवारात शेतात केली हत्या..


चोपडा प्रतिनिधी


धनवाडी तालुका चोपडा शिवारातील शेत गट क्रमांक 101 मध्ये कापूस पिकामध्ये रेखाबाई दुरसिंग बारेला (वय 44 मूळ राहणार पांजरिया तालुका वरला जिल्हा बडवानी) या महिलेचा तिच्या पतीनेच दुरसिंग टेटीया बारेला राहणार पांजरिया तालुका वरला जिल्हा बडवानी) याने पैसे मागण्याच्या कारणावरून डोक्यात लाडकी दांडक्याने व शरीरावर बऱ्याच ठिकाणी मारहाण करून गंभीर दुखापत करून तिला जीवे ठार केले आहे.
याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी दूरसिंग टेटीया बारेला याच्या विरोधात खूना चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी पती


सविस्तर वृत्त असे की, गरताड तालुका चोपडा येथील प्रकाश रमण पाटील यांचे धनवाडी शिवारातील शेतात रेखाबाई दुरसिंग बारेला (वय 44) ही पती दुरसिंग टेटीया बारेला यांच्यासोबत राहत होती. परंतु रेखाबाई आणि दूरसिंग यांच्यामध्ये पैसे मागण्याच्या कारणावरून भांडण झाले. भांडणांमध्ये पती व आरोपी दूरसिंग टेटीया बारेला याने दिनांक १९ च्या सकाळी आठ वाजे पूर्वी (वेळ निश्चित नाही)आव्हाने तालुका जिल्हा जळगाव यांच्या येथील रहिवासी कैलास सुखदेव पाटील यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक 101 मध्ये रेखाबाई बारेला हिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले, तसेच तोंडावर, डाव्या हनुवटीवर आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागावर बऱ्याच ठिकाणी मारहाण करून तिला गंभीर दुखापत करून तिला जीवे ठार केले आहे.


खाचणे तालुका चोपडा येथील योगराज नामदेव पाटील (वय 57) यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी दूरसिंग टेटीया बारेला याच्या विरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
घटनास्थळी अमळनेर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक सुनील नंदवालकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी भेट दिली असून जीवे ठार मारण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य ताब्यात घेतलेले आहे व स्पॉट पंचनामा केला आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More