बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे चोपडा नाशिक बसला अपघात, जीवितहानी नाही..!
महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क
चोपडा आगारातून दि .२२ रोजी सकाळी ११ वाजता सुटलेली चोपडा नाशिक या बसचा रस्त्यावरील खड्डा चुकवितांना चालकाचा स्टिअरिंग वरील ताबा सुटल्याने बस तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या गेट मधून आतमध्ये घुसली.मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,दि .२२ रोजी सकाळी ११ वाजता सुटलेली चोपडा नाशिक बस(बस क्रमांक एम एच १४ बीटी २१४२) धरणगाव रस्त्यावरील तापी सूतगिरणी जवळ गेली असता खड्डा चुकवितांना चालकाचा स्टिअरिंग वरील ताबा सुटल्याने बस तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या गेट मधून आतमध्ये घुसली. यावेळी बसचा पुढील भागाचे नुकसान झाले आहे.

या बसमध्ये ६१ प्रवाशी प्रवास करीत होते सुदैवाने यात मात्र जीवित हानी झाली नाही.हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे दिसून येत असल्याचे समजते.

बसमध्ये ६१ प्रवाशी होते यात मात्र जीवित हानी झाली नाही.या महामार्ग वर रस्त्यावरील खड्ड्यामुळे सदर अपघात झालेला असल्याची प्रथम दर्शनी दिसून येते आहे.
## ६१ प्रवाश्यांचे प्राण वाचले : बस चालकाचा हलगर्जीपणा दिसून आल्याने त्यांना तात्पुरते निलंबित केले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दिली.












