लाचखोर ग्रामसेवक एसीबी चा जाळ्यात,पाच हजाराची लाच घेताना अटक…
चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव ग्रामपंचायतीचे लाचखोर ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय. ३९) याला ५ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
यातील तक्रारदार यांची पारगाव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. त्याप्रमाणे यातील आरोपी ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार (वय-३३) यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचे कडे ७५०० रुपयांची लाचेची मागणी केली. आज दि.३१/०१/२०२४ रोजी पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असताआरोपी यांनी तडजोडी त्यांना ५००० रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे तालुक्यात अनेक ठिकाणी लाच लुचपत विभागाकडून अनेक लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर धडाकेबाज कारवाई करीत आहेत त्यांचेवर अडावड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लाच लुचपत परिक्षेत्र नाशिक विभागीय पोलीस अधिक्षक श्रीमती. शर्मिष्ठा घारगे वालावलकर व अपर पोलीस अधिक्षक श्री. माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगांव जिल्ह्याचे ला.प्र.विभाग पोलीस उप अधीक्षक, सापळाचे प्रमुख श्री. सुहास देशमुख,सापडा पथकातील दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने व कारवाई साठी मदत पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स. फौ. सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो. ना किशोर महाजन, पो.ना सुनिल वानखेडे, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ, पो. कॉ. प्रणेश ठाकुर, पो. शि अमोल सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.













