चहार्डीत अवैध दारू विकणाऱ्यावर गावकऱ्यांची कारवाई, सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त


प्रतिनिधी | चोपडा

दि ९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चहार्डी येथे गूळ मोह नवसागर मिश्रित गावठी हात भट्टीची दारू विकणाऱ्यांवर गावकऱ्यांच्या सूचनेवरून पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करत सतरा हजार पाचशे रुपये किंमतीची दारू व साहित्य जमा करून दारू विकणाऱ्या कन्हैय्या सोनवणे व सुमान्या बारेला यांच्यावर कारवाई केली आहे.

चोपडा शहर व अमळनेर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्या मुळे फार मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली आहे.चहार्डी गावात कोरोना समितीची बैठक मिटींग होती. त्यावेळी गावात अमळनेर वरुन लोक चहार्डी गावात दारु पिण्यासाठी येतात असे गावातील लोकाची तक्रार ग्रामपंचायत मध्ये करण्यात आली.त्या वेळी गावात दारु विकणाऱ्या कन्हैय्या सोनवणे व सुमान्या बारेला यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरपंच, पोलिस पाटील,ग्रा प सदस्य, कोरोना समिती यानी गावात त्याच्या घरी जाऊन कारवाई केली.
गावातील तांडा भिलाटी व हनुमान नगर वस्तीत जाऊन सतरा हजार मुद्देमालाची मोह नवसागर मिश्रित गावठी हात भट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.
या कारवाई वेळी सरपंच सौं प्रमिला प्रकाश सोनवणे, उपसरपंच तुळशीराम धनराज कोळी, ग्रामविकास अधिकारी सुनिल महाजन ग्रा प सदस्य किरण चौधरी ,मिनाबाई पाटील, संदीप पाटील, वर्षा पाटील, संजय मोरे, इंदुबाई वारडे प्रशांत पाटील,लिलाबाई भिल
जगदीश सोनवणे,रुपाली पाटील,उषाबाई पाटील,धनंजय सुर्वे,आशाबाई पाटील,
कल्पनाबाई महाजन, ग्रामस्त प्रकाश सोनवणे ,दत्तात्रेय पाटील,नितीन सोनवणे, सुनिल सोनवणे ,रघु वारडे,जंगलु भिल, योगश पाटील, सुरेश पाटील,ज्ञानेश्वर पाटील, अर्जुन कोळी, सुदाम महाराज, ग्रा पं कर्मचारी पंकज कोळी, संदीप कोळी , उपस्थिति होते.
पोलिस पाटील रोहीत रायसिंग,पोलिस बिट हवालादार मधुकर पवार, प्रदीप राजपुत, यानी दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More