मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहू द्या – डॉ.प्राजक्ता भामरे

मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहू द्या – डॉ.प्राजक्ता भामरे

चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप विद्या मंदिरातर्फे माता पालक संघाच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.या सभेत शाळेतील विद्यार्थिनींच्या माता पालकांना आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात प्रशालेच्या पर्यवेक्षिका माधुरी पाटील यांनी मुलींशी जास्तीत जास्त संवाद साधा,त्यांच्या सहवासात रहा असा बहुमोल सल्ला दिला.यानंतर डॉ.प्राजक्ता भामरे यांनी माता पालकांशी संवाद साधला.

काळाबरोबर आपण अनेक बदल स्वीकारले आपल्या हातात मोबाईल आले, घरात टीव्ही आला परंतु मुलींच्या शिक्षणाबाबत आपण हे बदल का स्वीकारत नाही,आपण दागिन्यांची पैठणीची जितकी काळजी घेतो तितकीच काळजी आपण या कन्यारत्नाची का घेत नाही, त्यांना पुरेसा वेळ का देत नाही असे महत्वाचे प्रश्न त्यांनी पालकांना विचारले. कमी वयात लग्न करून देणे हे कुठल्याच समस्येवरचे उत्तर नसून मुलींशी संवाद साधून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे ही आजच्या काळाची गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. पालकांच्या मुलींच्या आरोग्यविषयक प्रश्नांची देखील त्यांनी यावेळी उत्तरे दिली तसेच शंकांचे निराकरण देखील केले. पालक प्रतिनिधी म्हणून शितल नागपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.एस.गुजराथी,
पर्यवेक्षक श्री.पी.डी.पाटील,
श्री.एस.एस.पाटील यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती जयश्री बडगुजर तसेच आभार प्रदर्शन श्रीमती दीपाली शहा यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सुनंदा वारडे,गजाला अन्सारी,सारिका बाविस्कर,योगिता बोरसे,करुणा पाटील,प्रियंका पाटील या सर्व शिक्षिका भगिनींनी सहकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More