कपाशी व्यापाऱ्याची गाडी अडवून तब्बल १ कोटी ६० लाखांची रोकड घेऊन अज्ञात चोरटे पसार…

कपाशी व्यापाऱ्याची गाडी अडवून तब्बल १ कोटी ६० लाखांची रोकड घेऊन अज्ञात चोरटे पसार…

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क धरणगाव प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील आज दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाऱ्याची गाडी अडवून तब्बल १ कोटी ६० लाखांची रोकड अज्ञात चोरटे घेऊन पसार झाले असल्याची घटने मुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंगचे पेमेंट जळगावहून पिंप्रीला जाण्यासाठी कारमधून नेले जात होते. निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली गाडी येताच स्क्रॉरपीओ कारमधून आलेल्या तिघांनी पैसे असलेल्या गाडी अडवून अवघ्या काही मिनिटात पैसे लुटून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहचले असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. दुर्गेशच्या संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहिती नुसार निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली त्यांची क्रेटा कार येताच समोरून बोलेरो कारने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे क्रेटा कारचे टायर पंचर झाले. त्यानंतर चोरट्यांनी स्क्रॉरपीओमधून उतरत थेट क्रेटा कारवर हल्ला चढवला. कारमध्ये तिघं जण बसलेले होते.काही कळण्याच्या आधीच त्यांनी १ कोटी ६० लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन जळगावच्या दिशेने पळ काढला. विशेष म्हणजे चोरट्यांनी आणलेली स्क्रॉरपीओ कार तिथंच सोडून पळ काढला आहे.

कारमध्ये तलवार, लाठीकाठी तसेच पिस्तुल असल्याचे देखील कळते. तसेच चोरटे तीनहून अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे  कारण गाडी सोडून पळ काढल्यामुळे पुढे त्यांना घेण्यासाठी कुणी तरी थांबले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता चोरट्यांना कोणत्या वाहनात पैसे येणार आहेत?, किती रक्कम आहे?, याबाबतची संपूर्ण माहिती असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More