
चोपडा
कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे समाजजीवन पुर्णपणे ढवळून निघाले आहे.यात स्वगृही परतण्यासाठी मजुरांचे अतोनात हाल होत आहे. यावेळी सनद जिल्हा खंडवा मध्य प्रदेश येथील मजुर पायपीट करत आपल्या स्वगृही जात असतांना चोपडा तालुक्यातील हातेड बु येथे या मजुरांची जेवणाची व्यवस्था जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांनी करून देत मजुरांचा भर उन्हातं भोजनाचा प्रश्न सोडवला.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे , जितेंद्र सुर्वे ,नितीन शिरसाठ, प्रभाकर सनेर , भैय्या शिरसाठ , राकेश सोनवणे , प्रभाकर सोनवणे ,नवल सोनवणे , केदारनाथ पाटील ,रविंद्र निळकंठराव सोनवणे , मनोज शिरसाठ , शिवाजी सनेर , सुनील बाविस्कर ,मंदार बाविस्कर , जितेंद्र सनेर , प्रवीण पाटील इत्यादी ग्रामस्थांनी सहकार्य केले.












