घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला साथीदारासह सुरत येथुन पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश…
मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जळगांव जिल्हयात चोरी व घरफोडीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना मार्दशन करुन सुचना दिल्या होत्या.



दि. ०६/०३/२०२४ रोजी अक्षय संजय कोळी वय २१ रा. इंदीरानगर प्लॉट भाग अडावद ता चोपडा जिल्हा जळगांव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन त्याने त्याच्या साथीदारासह सावदा व चोपडा येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याबाबत चोपडा व सावदा येथे गुन्हे उघडकीस आले होते. सदर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी १) शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. हातेड बु।। ता. चोपडा जि. जळगांव व त्याचा साथीदार २) सचिन उर्फ भैय्या रामदास देवरे वय ३१ रा. सर्वोत्तम हॉटेल, हलदरु रोड, हरेकृष्णा सोसायटी, फ्लॅट नं. २०१, कडोदरा, सुरत (गुजरात) अशांची नावे निष्पन्न करण्यात आले होते.

सदरचे आरोपी सुरत येथे असल्याची गोपनिय माहिती मा. पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त अमलदार संदीप रमेश पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, कमलाकर भालचन्द्रं बागुल, गोरखनाथ रामभाऊ बागुल, चालक महेश सोमवंशी अशा पोलीस अंमलदाराचे पथक तयार करुन त्यांना सुरत गुजरात येथे पाठवले होते.

त्याप्रमाणे वरील पथकाने सुरत येथे जावुन गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी १) शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. हातेड बु।। ता. चोपडा जि. जळगांव व त्याचा साथीदार २) सचिन उर्फ भैय्या रामदास देवरे वय ३१ रा. सर्वोत्तम हॉटेल, हलदरु रोड, हरेकृष्णा सोसायटी, फ्लॅट नं. २०१, कडोदरा, सुरत (गुजरात) यांना सुरत शहरातुन ताब्यात घेवुन गुन्हयाचे पुढील तपासकामी सावदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.













