प्रेमाखातर शोएब बनला सोनू…. अवघ्या तीन दिवसांत उत्तराखंडात लावले लग्न…
लग्नासाठी धर्मांतर…. मॅरेज सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल…
चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा शहरातील एका भागातील युवतीस लग्नाचे आमिष दाखवत शहरातील के.जी एन कॉलनीतील शोएब सैय्यद हा युवतीस घेऊन पसार झाला होता. त्या संदर्भात चोपडा शहर पोलिस ठाण्यात युवती हरविल्याची नोंद करण्यात आली होती . मुलीचा तपास लवकर न लागल्यास मुलीच्या आईने आत्मदहनाचा इशारा चोपडा शहर पोलिसांना निवेदन द्वारे दिला होता.


सदर घटना घडल्या नंतर अवघ्या तीन दिवसांत उत्तराखंडात जावून शोएबने आपल्या प्रेमाखातर धर्मांतर करून सोनू या नावाने लग्न केल्याचे समजते. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सदर घटना हि पूर्वनियोजित असावी अशी चर्चा शहरात रंगली असून अवघ्या तीन दिवसांत धर्मांतर करून विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळालेच कसे ? अशी चर्चा रंगू लागली आहे.

सोनू उर्फ शोएब अली रहिवासी-के.जी. एन कॉलनी चोपडा या युवकाने इच्छेनुसार प्रथम आर्य समाज मंदिर, दिल्ली येथे धर्म बदलला नंतर शिव मंदिर डेहराडून येथे विवाह केला आणि नंतर डेहराडून न्यायालयात जाऊन विवाहाची नोंदणी केली. दोघांनीही विवाह केला. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, आम्ही पुर्णपणे मोठे झालो आहोत. भिन्न धर्मामुळे आमच्या दोन्ही घरच्यांचे पटत नव्हते, त्यामुळे आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला विरोध केला आहे आणि आम्हा दोघांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, त्यामुळे आम्हा दोघांनाही धोका आहे. पत्रात विनंती केली आहे की, आम्हा दोघांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये व आम्हा दोघांनाही सुरक्षितता प्रदान करण्यात यावी.
कुणीतरी व्यक्ती आवडणं म्हणजे प्रेम… कुणाच्या आठवणीं मध्ये हरवून जाण म्हणजे प्रेम…! प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात… प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात… शोएबने तर हद्दच केली.. शोएबने आपल्या प्रेमासाठी चक्क धर्म परिवर्तन करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे…. आणी लग्न करून पहिली विनिंग जिंकली सुध्दा असे बोलले जात आहे पण सेकंड इनिंग मध्ये यशस्वी होईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे….













