महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा येथील पंकज विद्यालयाचे उपशिक्षक आर डी पाटील यांना ICONIC MENTOR IN COACHING AWARD 2024 हा पुरस्कार ATMIA GLOBAL EDUCATION SERVICE MUMBAI व विद्या प्रबोधिनी जळगाव तर्फे प्रदान करण्यात आला.


शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम व सेवांसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार जळगाव येथील आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत डॉ चिराग वाघेला ( संचालक – आत्मिया एज्युकेशन, मुंबई ) , रोहीत गोकाणी ( संचालक – आत्मिया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस, मुंबई – नाशिक – जळगाव ) , योगेश पाटील ( संचालक – विद्या प्रबोधिनी, जळगाव ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सदर कार्यक्रम रिगल थिएटर , नेहरू चौक, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
त्यांच्या या यशाबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, सचिव अशोक माधव कोल्हे, संचालक नारायण बोरोले,संचालक गोकुळ भोळे यांच्यासह मुख्याध्यापक एम व्ही पाटील ( प्राथमिक ) , मुख्याध्यापक व्ही आर पाटील ( माध्यमिक ) , प्राचार्य डॉ आर आर अत्तरदे, प्राचार्य मिलिंद पाटील, प्राचार्य केतन माळी, बालविभाग प्रमुख सौ रेखा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नातेवाईक व मित्र परिवार कडून अभिनंदन होत आहे….













