चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी !#५ दलाल, १० मालकीण महिलांसह ६० महिलांना ताब्यात !

चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी !#५ दलाल, १० मालकीण महिलांसह ६० महिलांना ताब्यात !

चोपडा प्रतिनिधी

चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा पोलिसांच्या पथकाने २० रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत एकूण ६० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कुंटनखाना चालवणाऱ्या ११ महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर शहरातील  नगर पालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने कारवाई केली.


पथकाने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात जिल्ह्यासह परराज्यातील ६० तरुणी आढळून आल्या आहेत. तर कुंटणखाना चालवणाऱ्या १० महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकली, त्यावेळी एकही गिन्हाईक नव्हते. पोलिसांनी ५ दलाल, १० मालकीण महिलांसह ६० महिलांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले होते. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात, अशी चर्चा आहे.


कुंटणखाना सुरु असलेल्या ठिकाणी ग्राहक म्हणून येत असलेल्या लोकांच्या दुचाकींची चोरी होत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.पोलिस अधिक्षकांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत या दुचाकी प्रकरणाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी
कुंटणखान्यावर धाड टाकली असून त्यातील 11 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे व बाकी महिलांना जळगाव येथील आशादिप येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती चोपडा पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांनी दिली केलेल्या कारवाही मुळे दुचाकी चोरीला आळा बसेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More