जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित आढळले जळगाव@१९३

जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भडगाव, पाचोरा, भुसावळ येथील स्वब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 61 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील एक 25 वर्षीय तरूण, भुसावळच्या तलाठी कॉलनीतील एक 18 वर्षीय तरूण तर निंभोरा, ता.भडगाव येथील 28 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 193 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More