प्रताप विद्या मंदिराचे तेरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी

प्रताप विद्या मंदिराचे तेरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र राष्ट्रीय परीक्षा परिषद,नवी दिल्ली यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMSE) घेतली जाते. या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत प्रताप विद्या मंदिराचे इयत्ता आठवीच्या१३विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पर्यंत दरमहा प्रत्येकी १००० रुपये म्हणजे वर्षाचे १२००० रुपये असे चार वर्षात एका विद्यार्थ्यासाठी ४८००० रुपये मिळतात. यामुळे या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खुप मोठी आर्थिक मदत होते.

मागील १६ वर्षांपासून NMMS परिक्षेत या विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान कायम ठेवून आहेत.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची नावे :
१) लोहार जय राजेश,२) पाटील दिव्या समाधान
३) शेलार प्रिया लक्ष्मण,४) सांगोरे विशाल रोहिदास
५) शिंपी सचिन योगेश,६) भावसार खुशी घनश्याम
७) भदाणे जयेश उदय,८) सोनवणे भूषण प्रकाश
९) पाटील समृद्धी ज्ञानेश्वर,१०) पाटील जयेश संदीप
११) आडगळे लोकेश मच्छिंद्र,१२) बाविस्कर हितेश संदीप,१३) गायकवाड भार्गवी गणेश

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचीव माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, मुख्याध्यापक  पी. एस. गुजराथी सर, पर्यवेक्षक  एम. डब्ल्यू. पाटील मॅडम, एस. एस. पाटील सर, पी. डी. पाटील सर, ए. एन. भट सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More