देशात मोदींची गॅरंटी तर रावेर मतदार संघात श्रीराम पाटील यांची गॅरंटी…# श्री धुनीवाले दादाजी दरबारात दर्शन घेत चोपडा तालुक्यात प्रचारास सुरुवात…

देशात मोदींची गॅरंटी तर रावेर मतदार संघात श्रीराम पाटील यांची गॅरंटी…# श्री धुनीवाले दादाजी दरबारात दर्शन घेत चोपडा तालुक्यात प्रचारास सुरुवात…

प्रतिनिधी / चोपडा


लोकसभा निवडणुकीत एकी कडे मोदींची गॅरंटीचा बोलबाला आहे तर रावेर मतदार संघात श्रीराम पाटील यांनी स्वतःचा गॅरंटी वर रावेर मतदार संघाचे समस्या सोडवणार असल्याची गॅरंटी दिली आहे .


चोपडा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात नागरिकांनी मागील दहा वर्षात तालुक्यात कुठलाही विकास झालेला नाही. हाय मास्क लॅम्प आणि बसायला बाक देऊन विकास कामांचा दावा केला जात आहे अशी खंत व्यक्त करणाऱ्या सामान्य नागरिकांनी आपल्या अनेक समस्याचा पाढा वाचून दाखवला .त्यावेळी निवडणुकीत मी दुसऱ्याच्या गॅरंटीवर मत मागणार नाही.रावेर मतदार संघातील मात्र या समस्या व प्रश्न भावी काळात सोडविणार हि आपली गॅरंटी आहे असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी चोपडा तालुक्यात प्रचार भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना दिली आहे.


रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी निमगव्हाण (ता चोपडा )येथील प्रकाशगड श्री धुनीवाले दादाजी यांच्या दरबारत दर्शन घेऊन चोपडा तालुक्यात प्रचार दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील , राजेंद्र पाटील, माजी सभापती डी पी साळुंखे, डॉ. चंद्रकांत बारेला, ललित बागुल, तुकाराम पाटील, नंदू आबा पाटील, दीपक आधार, देविदास कोळी, सुनील पाटील, राजेंद्र भाटिया, जगत पाटील, गोपाल धनगर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चोपडा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात खाचणे, कुरवेल, सनपुले , कठोरा, कोळंबा, वडगाव , खडगाव, मंगरूळ, गोरगावले खु!! , खेडीभोकरी येथे ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला.


नागरिकांचे प्रश्न व समस्या ऐकून घेत त्या सोडविण्याचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी खाचणे येथील माजी सरपंच धनराज पाटील , भगवान पाटील, संजय पाटील ,सुनील पाटील ,वासुदेव पाटील, सरपंच सौ .रामाबाई पांडुरंग पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, डी एम पाटील तर कुरवेल येथे माजी जि.प अध्यक्ष गोरख तात्यासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुरवेल ग्रामस्थ उपस्थित होते. सनपूले येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत संवाद साधला. यावेळी वासुदेव पाटील, सरपंच पुंजू कोळी, विक्रम पाटील, हिरामण पाटील, रामकृष्ण पाटील, दिगंबर पाटील, विनोद पाटील, यशवंत पाटील, जयवंत पाटील उपस्थित होते. कठोरा येथील सरपंच एकनाथ कोळी, माजी चेअरमन शिवाजी पाटील, डॉ. विलास पवार, माजी चेअरमन आनंदराव पाटील , माजी सरपंच अधिकार पाटील, सुनील पाटील यांच्याशी चर्चा केली. कोळंबा व वडगांवसिम येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत संवाद साधला.


मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न राबवू : श्रीराम पाटील


चोपडा तालुक्यातील मंगरूळ गावच्या ग्रामपंचायतीचे कार्य सर्वार्थाने आदर्श व उत्कृष्ट असून हा पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये राबविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. मंगरूळ गावात प्रचार फेरी आली असता त्यांनी ग्रामपंचायत इमारतीचीही पाहणी करून ग्रामपंचायतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी सरपंच उज्वला अतुल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अतुल भीमराव ठाकरे, भैय्यासाहेब निकम, राजेंद्र ठाकरे, जगदीश निकम, संजय ठाकरे, शांताराम ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More